news

गंगापूर तालुक्यातील बगडी येथे जलसमाधी आंदोलन सुरू

Share Now

गंगापूर :- तालुक्यातील बगडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या
जमिनी या गोदावरी नदीकाठी असून नदीला येणाऱ्या पाण्यामुळे, तसेच गोदेचे बॅक वॉटर (फुगवट्यातील
पाणी) सतत आसपासच्या परिसरात व रस्त्यावर पसरते.

त्यामुळे शेतात जाण्याकरिता असलेला रस्ता वाहून जातो. सध्या देखील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. सध्या शेतात कापूस वेचणीसाठी आला आहे. त्यामुळे बगडी येथील महिलांना कापूस वेचणीसाठी थर्माकलच्या तराफ्याचा वापर करून पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत शेत गाठावे लागत आहे.

प्रेमप्रकरणातून प्रेयसीसह स्वतः पेटवून घेणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू; मुलीवर उपचार सुरु

गोदावरी नदीच्या पाण्यातून तराफ्याद्वारे शेतात जाताना महिला. सोमवारी सकाळी हे चित्र पाहावयास मिळाले. सदरील समस्या कायमस्वरूपी असून बगडी येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी लोक सहभागातून येथे मुरूम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला जातो. मात्र, गोदावरी नदीला येणाऱ्या पाण्याने हा रस्ता वाहून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी तराफ्याच्या साह्याने जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागतो.

तालुक्यातील अनेक गावे जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे पुनर्वसित झाली आहेत. या धरणाला सुमारे ५० वर्षे उलटून देखील धरणासाठी जमिनी घेतलेल्या गावातील लोकांना शासनाच्या वतीने मूलभूत सुविधा अद्यापही मिळाल्या नसून शेतकरी, ग्रामस्थांच्या या जीवघेण्या समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

सध्या काढणीला आलेला कापूस व तोडणीला आलेला ऊस रस्ता नसल्याने गोदावरीचे पाणी पार करून कसा काढायचा याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

याठिकाणी पूल झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. त्याकरिता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी ? शिंदे गटाच्या आमदाराने दिली महत्त्वाची माहिती !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *