जालना जिल्यात आज ‘जल आक्रोश’ मोर्चा

सध्या राज्यात पाणीप्रश्न सुरु आहेत, ते सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी सरकारविरोधात मैदानात उतरली आहे. बुधवार,१५ जून रोजी म्हणजेच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जालन्यात दाखल झाले आहेत. जालन्यात पाणी प्रश्न तीव्र झाला असून, या समस्येवर वाचा फोडण्यासाठी भाजपा जालन्यात दाखल झाली आहे.

काळ्या मक्याची शेती, कोणत्याही हंगामात लागवड करून मिळवा अधिक नफा

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पाण्याच्या समस्या सुरु आहेत. जालन्यातील मामा चौकातून भाजपाचा जल आक्रोश मोर्चा निघाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सुरु आहे. त्यांच्यासोबत रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक नेते या मोर्चाला उपस्थित आहेत. या मोर्चाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. ढोल ताश्यांच्या गजरातून मामा चौकातून मोर्चा निघाला आहे.

दहावीचा निकाल लागणार ‘या’ तारखेला, असा पाहता येईल ऑनलाईन निकाल

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने पाणी समस्या सोडवता यावी म्हणून १२९ कोटींची तरतूद केली होती. मात्र अजूनही ठाकरे सरकराने मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवलेला नाही. ठाकरे सरकार जनतेचा पाणी प्रश्न गंभीर घेत नाही आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

याआधी भाजपाने औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चालाही जनतेने खूप गर्दी केली होती. या मोर्चात जास्त महिलांचा समावेश होता. त्यावेळी १ हजार ६८० कोटी रुपयांचा प्लॅन दिला आहे, तरीही ठाकरे सरकारने जनतेचा प्रश्न सोडवलेला नसल्याचे फडणवीस म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *