सहा मजली इमारत कोसळून 15 जण गंभीर तर 5 जण अडकल्याची भीती

सुरतमध्ये सहा मजली जीर्ण इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. इमारत कोसळल्यामुळे 15 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील सुरतमध्ये सहा मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळल्याने सुमारे 15 जण गंभीर जखमी झाले असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 5 जण अजूनही गाडले गेल्याची भीती आहे. बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या सचिन जीआयडीसी परिसरात मुसळधार पावसात सहा मजली इमारत कोसळली. या इमारतीची अवस्था अतिशय जीर्ण होती, तरीही येथे 10-15 लोक राहत होते. इमारत कोसळल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून गाडलेल्या नागरिकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या अपघाताची माहिती प्रशासनालाही देण्यात आली. प्रशासनाकडून अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आले.

तिसरी आघाडी स्थापन होणार! महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात होणार स्पर्धा

 संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीती, गोंधळाचे वातावरण

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, ही इमारत पूर्णपणे जीर्ण झाली होती आणि तरीही त्यात काही लोक राहत होते. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून बचावकार्य सुरू आहे. सध्या अग्निशमन दल घटनास्थळावरून ढिगारा हटविण्यात व्यस्त आहेत. इमारत कोसळली तेव्हा इमारतीत राहणारे सर्व लोक धावत बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे. इमारत कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूची अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही शोध सुरू आहे. त्यामुळे लोक अडकण्याची भीती असल्याने ढिगारा हटविण्यासाठी मशिनचा वापर केला जात आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *