क्रीडा

IPL 2022 वर कोरोनाच संकट

Share Now

कोरोनाच वाढत संकट बघता कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत, याचा परिणाम आयपीएलच्या यंदाच्या हंगाम्यावर होणार आहे. भारतात वाढत असलेले रुग्ण म्हणजे तिसऱ्या लाटेचे संकट येणार असल्याचे चित्र सध्या तरी आहे. केंद्रीय आकडेवारी नुसार गेल्या २४ तासात देशातील ररुग्णसंख्या १ लाख पेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत.

यासर्व गोष्टीचा परिणाम यंदाच्या आयपीएल सीजनवर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका रिपोर्ट प्रमाणे २०२२ चे मेगा ऑक्शन दहा दिवसांनी पुढे ढकलले जाऊ शकेल, या वर्षीच ऑक्शन सात आणि आठ फेब्रुवारी रोजी होणार असे क्रिकबज या वेबसाईटवर सांगितले होते.

बीसीसीआय कडून अजूनतरी आयपीलच्या मेगा ऑक्शनच्या तारखा अजूनतरी जाहीर केल्या नाही. बंगळुरूमध्ये सात आणि आठ फेब्रुवारी रोजी ऑक्शन होणार असे क्रिकबजने सांगितले.

त्यासोबतच अहमदाबाद संघासोबत झालेला वादामुळे लिलावाच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या असू शकतात, असा दावा एका रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. अहमदाबादच्या संघ मालकांना अद्याप बीसीसीआयकडून काही महत्वाची कागदपत्रे मिळालेली नाहीत. बीसीसीआय अहमदाबाद सोबतच्या वादावर गंभीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *