सरकारच्या वतीने संभाजीराजेंना चर्चेसाठी निमंत्रण , वर्षा बंगल्यावर ११ वाजता बैठक
संभाजीराजे यांच्या वतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण समितीची मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ वाजता वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे.
२६ फेब्रुवारी पासून खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा समाजाचे आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहे. काल गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी त्यांची भेट घेऊन आरक्षण आणि मागण्यांवर सकारात्मक चर्चा देखील केली परंतु खासदार संभाजीराजे यांनी माघार घेण्यात नकार दिला.
राज्य सरकारकडून आज चर्चेसाठी निमंत्रण आले असून, वर्षा बंगल्यावर सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. आंदोलनाला कुठपर्यंत घेऊन जायचं हे सरकारने ठरवावं , आज सकाळी अचानक शुगर आणि रक्तदाब कमी झाला आहे. आमरण उपोषण करण्याची माझी इच्छा नाही महाराजांनी ज्या प्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्या प्रकारे सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत .
गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिली आहे महाराजांनी सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला होता आरक्षणाचा दीर्घकाळ लढा आहे. त्यामुळे या बावीस मागण्यांपैकी सहा मागण्या कमीतकमी मार्गी लागल्या या मागण्यांना कोर्टात निर्बंध आहेत असं काही नाही याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळे नाही मला त्रास होतोय सरकारने ठरवावं हे आंदोलन कुठपर्यंत न्यायचं आहे. सरकारकडून बोलावणे आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वतीने शिष्टमंडळासोबत उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ वाजता बैठक होणार आहे.