इंस्टाग्राम युजर्ससाठी महत्वाची बातमी.. आता मोजावे लागणार पैसे
सोशल मीडिया वर सर्वच सक्रिय असताना दिसतात. अन्न वस्त्र निवारा सोबतच सोशल मीडिया किंवा मोबाईल हे सुद्धा आजच्या काळाची मूलभूत गरज बनलेली आहे. फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्राम चालवणारा वर्ग हा सुद्धा प्रचंड मोठा आहे. सर्वजण या प्लॅटफॉर्म वर व्यक्त होताना दिसतात. स्पेसिफिक मीडिया वापरणारा वर्ग देखील प्रचंड वाढला आहे. फेसबुक वापरणारा वर्ग 2.85 Billion एवढा असून व्हाट्सअँप चा 2 Billion तर इंस्टाग्राम 1.386 Billion आणि यू ट्यूब चा 2.291 Billion एवढा आहे. यातच आता इंस्टाग्राम युजर्सला सोशल मीडिया अकाउंट साठी पैसे मोजावे लागणार आहे. इंस्टाग्राम क्रिएटर्स आणि इंफ्लूएंसर्स यांना याचा फायदा होईल असं कंपनीचे मत आहे.
इंस्टाग्राम सध्या सब्क्रिप्शन या फिचर वर काम करत आहे. यामध्ये इंस्टाग्राम युजर्स यांना कंटेंट ऍक्सेस करण्याकरता दर महिन्याला 89 रुपये भरावे लागणार असून इंस्टाग्राम सब्सक्रिप्शन अॅपल अॅप स्टोअरवर लिस्टेड आहे. यासाठी इंस्टाग्राम सबस्क्रिप्शन श्रेणीही तयार करण्यात आली असून सध्या येथे हे शुल्क 89 रुपये प्रति महिना दिसत आहे. पण जेव्हा ते युजर्स साठी आणले जाईल, तेव्हा त्यामध्ये बदल देखील केले जाऊ शकतील. असं टेक क्रंच च्या अहवालात म्हंटले आहे. इंस्टाग्राम वापरकर्ते आता इन्स्टा सब्क्रिप्शन घेतील की फेसबुक कडे वळतील असा प्रश्न उद्भवतो.
इंस्टाग्राम च्या सबस्क्राईब बटनाचे टेस्टिंग चालू आहे. हे बटण प्रोफाइल वर दिसणार असून सदस्यता शुल्क याबाबत पर्यायही देण्यात येणार असल्याचं टिपस्टर @alex193 यांनी सांगितलं आहे. सबक्रिप्शन घेतल्यानंतर यूजर्स त्यांच्या आवडत्या क्रिएटर्सचे कंटेंट बघू शकणार असून या सबस्क्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सला एक बॅज देण्यात येणार आहे. ज्यावेळी एखादी कमेंट मेसेज करण्यात येईल,
तेव्हा तुमच्या वापरकर्त्याच्या नावासमोर हा बॅज दिसणार आहे. हे ग्राहक वापरकर्त्याची ओळख पटवून देईल. हे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर, उत्पन्न आणि सबस्क्रिप्शन ची लास्ट तारीख दाखवण्यात येणार आहे. मागे काही महिन्यांपूर्वी सोशल मीडिया टेक्निकल कामामुळे बंद पडले होते. त्यावेळी फेसबुकचे लाखोंचे नुकसान झाले होते. तसेच नुकसान या कंपनीने घेतलेल्या निर्णयाने तर होणार नाही ना??