क्राईम बिटमहाराष्ट्र

शिवसेनाच्या आणखी एका बड्या नेत्यांची आयकर विभागाकडून चौकशी ; राज्यभर छापेमारी

Share Now

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाकडून कारवाईचे सुरू आहे. यापूर्वी शिवसेनेच्या यशवंत जाधव , राहुल कनाल आता आणखी एका बड्या नेत्यांची चौकशी लागण्याची दाट शक्यता आहे.
दि ८ मार्च रोजी आयकर विभागाने राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकले होते.

मुंबई तसेच राज्यभर २६ ठिकाणी छापेमारी झाली. यामध्ये राज्यातील शिवसेनेचा एक मोठा नेता आयकरच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे. युवा सेना पदाधिकारी राहुल कनाल, आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेना पदाधिकारी आणि केबल व्यावसायिक सदानंद कदम आणि एका सीएवर आयकर विभागाने धाड टाकली होती. मुंबई पुणे सांगली, रत्नागिरीत येथे छापे टाकले होते.

दापोली येथे एका मोठ्या राजकीय नेत्याने २०१७ साली मोठी जमीन खरेदी केली होती. १ कोटीच्या बदल्यात ही जमीन देण्यात आली होती. या १ कोटी १० लाख रुपयांची व्यवहाराची नोंद २०१९ मध्ये करण्यात आली. २०१७ ते २०२० या दरम्यान या जमिनीवर मोठे आलीशान रिसॉर्ट बनवले गेले.

नंतर ही जमीन अधिकृतरित्या त्या राजकीय नेत्याच्या नावे झाली. पण रिसॉर्ट पुर्ण झाल्यावर ही संपत्ती मुंबईतील एका केबल व्यावसायिकाला विकण्यात आली. पण फक्त स्टॅम्प ड्युटी भरली गेली. या रिसॉर्टवर ६ कोटी खर्च करण्यात आले होते.

या चौकशीत एका सरकारी अधिकारी देखील आहे.
या सरकारी अधिकाऱ्याने पुण्यात एक बंगला, एक फार्म हाऊस, तासगाव येथे मोठे फार्म हाऊस, सांगलीमध्ये २ बंगले, तनिष्क व कॅरेट नावाचे हिऱ्यांच्या दागिन्यांचे शोरुम, व्यावसायिक गाळे, पुण्यात ५ फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट, नवी मुंबईत जमीन, सांगली बारामती पुणे येथे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची संपत्ती अशी माया गोळा केली. एवढंच नाहीतर बांधकाम व्यावसाय आणि पाईप निर्मितीचा व्यवसाय सुद्धा सुरू केला. या व्यवसायात राज्य सरकार मार्फत काही सवलत ही देण्यात आल्याची चर्चा आहे.

बनावट व्यवहार आणि बनावट कागदपत्रांच्या साह्याने जवळपास २७ कोटी रुपयांचा अपहार केला गेला आहे. बारामती येथे २ कोटी रुपये रोख देवून जमिनीचा व्यवहार करण्यात आला. ज्यात कर बुडवण्यात आला असल्याचे समोर आले आहे. छाप्या दरम्यान ६६ लाख रुपये रोख, इलेक्ट्रॉनिक पुरावे, डिजिटल डेटा जप्त करण्यात आला असून ते फॉरेंसिकला तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *