यशवंत जाधव यांच्या घरी चौथ्यां दिवशी चौकशी सुरूच, किरीट सोमय्या याचं सुचक ट्विट

शिवसेना नेते मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष जाधव यांच्या घरी आयकर विभागाची कारवाई सुरू असून गेल्या चार दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू आहे. चार दिवसापासून चौकशी सुरू असून अधिकाऱ्यांच्या हाती काय लागले अद्याप अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले असून शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केलेल्या घोटाळा प्रकरणी १८ ऑगस्ट २०२१ रोजी आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार केली होती, असे ट्विवरून सोमय्या यांनी सांगितले.

शुक्रवारी पहाटे यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून चौकशीस सुरुवात केली. सलग चार दिवस इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या माणगावातील घरी ही कारवाई सुरू आहे. शिवाय यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय यांच्या घरीदेखील आयकर विभागाने छापे टाकले आहेत. मुंबई महापालिकेच्या काही कंत्राटदारावर ही आयकर खात्याने छापा टाकून कारवाई केली आहे.

किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जानेवारी महिन्यात केला होता. मुंबई कोविड सेंटर उभारणीसाठी मोठा घोटाळा झालाय असे त्यांनी सांगितले. तसेच यामध्ये मनी लँडिंग केल्याचाही आरोप सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर केला.

मात्र आयकर विभागाच्या चार दिवसाच्या चौकशीनंतर यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागाने छापा घातला आहे. यामुळे या छापेमारी मध्ये यशवंत जाधव यांच्या घरातून आयकर विभागाच्या हाती काय लागेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *