शिवसेनेने आमदारांना दिले ‘अल्टिमेटम’, संध्याकाळी बैठकीला या अन्यथा…
गोहाटी मध्ये तब्बल ४० हुन अधिक आमदार एकनाथ शिंदें सोबत आहे, शिवसेनेचे दोन भाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आहे. असे स्पष्ट झाले. कॉग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता नको असे मत या गटाचे आहे. तसेच प्रहार पक्षाचे नेते बचू कडू यांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि ते देखील गोहाटीत असल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचे ५ आमदार देखील त्याच्या सोबत आहे. त्यात मंत्री अब्दुल सत्तर आणि मंत्री संदिमान भुमरे यांचा देखील समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉसिटीव्ह नाना पाटोलेंनी दिली माहिती
अशात शिवसेनेनं आमदारांना अल्टिमेटम दिले आहे, आज संध्याकाळी शिवसेनेने बैठक बोलवली आहे. यात हजार राहणे अनिवार्य असेल. बैठकीला गैरहजर असलेल्या आमदारांनावर पक्ष कडून कारवाई करण्यात येईल. आमदारांना व्हाट्सअप, ई-मेल द्वारे हे पात्र पाठवण्यात आले आहे. त्यात बैठकीला नसलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे, आता आमदार सभेला उपस्थित राहतील का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहे.
पपई पिकाला रोगापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी करा या उपाययोजना, नुकसान कमी होऊन उत्पन्न वाढेल
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉसिटीव्ह आहे. दरम्यान सध्या राज्यात राजकीय मोठा वादंग सुरु आहे. अश्यात आता मुख्यमंत्री कोरोना पॉसिटीव्ह झाले आहे. या पूर्वी राज्यपाल भगतसिंग कोषारी देखील कोरोना पॉसिटीव्ह असल्याची माहिती समोर अली होती. अश्यात या बैठकीला मुख्यमंत्री ऑनलाईन स्वरूपात उपस्थित असतील असे सूत्रानं कडून सांगितलं जात आहे.