डिसेंबर 2024 मध्ये भारतात हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन, पर्यावरणासाठी क्रांतिकारी पाऊल
भारताच्या रेल्वे क्षेत्रात क्रांतिकारी बदल, हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन डिसेंबर 2024 मध्ये
भारताच्या रेल्वे क्षेत्रात पुढील महिन्यात, म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये, एक महत्त्वाची क्रांती घडणार आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली, हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन भारतीय रेल्वेच्या जाळ्यात समाविष्ट होईल. पर्यावरणपूरक हायड्रोजन इंधन वापरून चालणारी ही ट्रेन डिझेलच्या वापरातून होणारे प्रदूषण कमी करेल आणि 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाकडे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
‘बंटेंगे तो कटेंगे’ वर अजित पवारांचा टोला, नवाब मलिकला तिकीट देण्याचे राष्ट्रवादीचे बचाव
हायड्रोजन ट्रेनच्या आगमनाने भारतीय रेल्वेच्या गतिशीलतेत आणि पर्यावरणावर मोठा प्रभाव पडणार आहे. या ट्रेनमधून कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि कणिक पदार्थ उत्सर्जित होणार नाही, जे पारंपारिक डिझेल इंजिनांमधून होणारे वायू प्रदूषण कमी करतील. यासोबतच, हायड्रोजन ट्रेनचा आवाजही 60 टक्क्यांनी कमी होईल, ज्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होईल.
Exclusive: Ground Report & Analysis पश्चिम -छत्रपती संभाजीनगर!
रेल्वे विभागाच्या योजनांमध्ये देशभरात 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची प्रस्तावित योजना आहे. यातील पहिला पायलट प्रोजेक्ट हरियाणामधील जिंद-सोनीपत मार्गावर लागू केला जाईल. या ट्रेनचा वापर मुख्यत: दुर्गम भागांमध्ये आणि पर्यटन स्थळांवर होईल, जसे की दार्जिलिंग, हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे आणि कालका-शिमला रेल्वे मार्ग.
- 750 रुपयांच्या डोसने गाय, म्हैस, वासरू देतील जन्माला ! हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी आहे वरदान, वाचा सविस्तर
- तेलबिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे, २१ राज्यांतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची तयारी
- ‘भारत’ ब्रँडचा तांदूळ, पीठ आणि डाळींची विक्री पुन्हा सुरू, यावेळी एवढी असेल किंमत
- ICAR ने रब्बीमध्ये HD3388 गव्हाच्या नवीन जातीची पेरणी करण्याचा सल्ला दिला, शेतकऱ्यांना 125 दिवसांत 52 क्विंटल उत्पादन मिळेल.
- शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीसाठी या 6 सुधारित वाणांचा वापर करावा, पुसा येथून बियाणे मागवण्यासाठी याप्रमाणे नोंदणी करा