देश

उरीमध्ये भारतीय जवानांनी केला तीन दहशदवाद्यांचा खात्मा

Share Now

लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांनी काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीचा मोठा कट उधळून लावला आहे. लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत तीन घुसखोर दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे दहशतवादी उरी क्षेत्रात घुसखाेरी करण्याच्या प्रयत्नात हाेते. यादरम्यान, आधीच सतर्क असलेल्या भारतीय लष्कराच्या गोळीबारात तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. लष्कराने त्यांच्या ताब्यातून दोन एके ४७ आणि एक एम १६ रायफल जप्त केली आहे. लष्कराने रविवारपासून नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या चार मोठ्या घटना हाणून पाडल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र लष्कर आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यात यश येत आहे.

शिवसेना संभाजी ब्रिगेडशी एकत्र, निवडणुकीसाठी नाही तर विचारांसाठी हातमिळवणी-उद्धव ठाकरे

गुरुवारी, उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील कमलकोट भागात मादियान नानक पोस्टजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांनी उरीच्या कमलकोट सेक्टरमधील मादियान नानक चौकीजवळ तीन घुसखोरांना ठार केले असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

आजपर्यंत सर्वाधिक उत्पादन देणारे गव्हाचे वाण – करण वंदना (DBW 187)

यापूर्वी अखनूर सेक्टरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. प्रत्यक्षात सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा लष्कराच्या जवानांनी पाठलाग केला. गेल्या ४ दिवसांत जवानांनी दहशतवाद्यांचा चौथा प्रयत्न हाणून पाडला आहे. २३ ऑगस्टच्या रात्री अखनूर सेक्टरमधील पालनवाला येथे लष्कराच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. तोपर्यंत गेल्या ७२ तासांत घुसखोरीची ही तिसरी घटना असल्याचे लष्कराने ट्विट केले होते. नौशेरा सेक्टरमध्येही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला हाेता. ताेही भारतीय लष्कराने हाणून पाडला आणि एका दहशतवाद्याला जिवंत पकडले. चाैकशी दरम्यान या दहशतवाद्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *