पंजाबातही पक्षांतराची लागण ‘या’ काँग्रेस नेत्याने सोडला पक्ष
पंजाब, उत्तर प्रदेश, गोवासह पाच राज्यात पुढील महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.या तारखा जाहीर होताच अनेकांनी पक्षांतर सुरु केले आहे,इतके दिवस राहून ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुर्लक्ष केलं, वंचित ठेवलं, अन्याय झाला अशी करणं देत पक्षांतर केलं जातंय. त्यातही उत्तरप्रदेश आणि पंजाबात जातीय समीकरण हे निवडणुकीचे अविभाज्य अंग आहे. त्यात आता काँग्रेस मध्ये अर्ध शतक घालवलेल्या एका नेत्याने आपण मध्ये प्रवेश केला, पंजाबात हे घडलं.
आधी उत्तर प्रदेशमध्ये तीन दिवसांत सात भाजपा आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पार्टीसह इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. शेजारचा पंजाब तरी आता कसा अपवाद राहणार ! पंजाबमध्ये देखील अनेक नेते पक्ष बदलत आहेत. ५० वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर जोगींदर मान यांनी आता आम आदमी पक्षात प्रवेश केलाय.
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जोगींदर मान यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याच्या आणि दुसऱ्या दिवशी आम आदमी पक्षात प्रवेश केला. जोगींदर मान यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी धक्का आहे. आपचे आमदार आणि पंजाबचे सह-प्रभारी राघव चढ्ढा यांनी जोगींदर मान यांचं पक्षात स्वागत केलं. ते म्हणाले की, मान यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या आप प्रवेशामुळे राज्यात पक्षाला मोठी चालना मिळेल. चढ्ढा यांनी यासंदर्भात ट्वीट केलंय.
शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषींवर कारवाई न केल्याबद्दल पंजाबमधील काँग्रेस सरकारवर नाराज आहेत असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या अनेक मागण्या राज्य सरकारने मेनी केल्या नाहीत म्हणून आपण नाराज असल्याचे सांगत मान यांनी पक्ष सोडला आहे.