Uncategorized

पंजाबमध्ये आप आघाडीवर तर काँग्रेस सत्ता मावळली

Share Now

या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये आतापर्यंत आम आदमी पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ एकूण जागा आहेत. यामध्ये आप तब्बल ९० जागांवर आघाडीवर . यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. विजयाचं सेलिब्रेशन देखील आपनं सुरु केलं आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेस आतापर्यंत केवळ १८ जागांवर आघाडीवर आहे. तर अकाली दल १० जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजप मात्र निष्प्रभ दिसून येत आहे.

काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *