क्राईम बिट

नाशिकमध्ये पाच कोटींचं घबाड जप्त, गाडी पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमधील हॉटेलमध्ये पाच कोटींचे घबाड जप्त; पोलिसांची मोठी कारवाई
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नाशिकमध्ये मोठी घडामोड घडली आहे. नाशिकमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा मारून पाच कोटी रुपये जप्त केले आहेत. या कारवाईत राजकीय नेत्यासह त्याची गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी सुरु असून या पैशांचा संबंध आणि त्यांचे उद्दीष्ट काय, यावर तपास सुरू आहे.

कल्याण पश्चिममधील प्रचारात अति उत्साहाचा धोका; उमेदवाराच्या केसांना लागली आग

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध दारूवर कारवाई; १ लाखांचा मुद्देमाल जप्त
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूचे वितरण रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुद्ध विभागाने मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुदंरवाडी परिसरात छापा टाकून अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यावेळी १ लाख रुपयांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे. एन-७ आंबेडकर नगर परिसरात एका घरात साठवलेली बिअर आणि देशी-विदेशी मद्यदेखील जप्त करण्यात आली आहे.

चुनाव आयोगाच्या चौकशीसाठी दबाव वाढला
या घटनांमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या तपासावर आणखी दबाव निर्माण झाला आहे. पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्यभर विविध ठिकाणी अवैध कार्यवाहीवर लक्ष ठेवले आहे, यामुळे आगामी निवडणुकीतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *