गेला होता मटण आणायला घेऊन आला 12 कोटी

केरळ : आपल्याला नेहमी जास्त पैसे कसे कमावता येईल हा विचार आपण करतो. आणि असेच अचानक आपल्याला तब्बल १२ कोटीची लॉटरी लागली तर, एक केरळातील गृहस्थ जे पेंटर होते त्यांना तब्बल १२ कोटी रुपयाची लॉटरी लागली आहे. केरळमधील कुदयमपाडी येथील रहिवासी असलेल्या सदानंदन यांना हि लॉटरी लागली आहे. ते सांगितले की, रविवारी सकाळी आपण बाजारातून मटण विकत घेण्यासाठी जात असताना सेल्वन नावाच्या तिकीट विक्रेत्याकडून मी लॉटरीचा ड्रॉ संपण्याच्या 5 तास आधी एका दुकानदाराकडून XG 218582 नंबरचे लॉटरी तिकीट खरेदी केले. हे तिकीट कोट्टायम शहरातील लॉटरी एजंट बिजी वर्गीस यांनी कुडेमपाडीजवळील पांडवम येथील लॉटरी विक्रेता कुन्नेपरंबिल सेल्वनला विकले.

हे तिकीट फक्त 300 रुपयांचे होते लॉटरीची दुसरी आणि तिसरी बक्षिसेही वितरीत करण्यात आली आहेत. द्वितीय पारितोषिक जिंकलेल्या 6 जणांना 3 कोटी रुपये तर तृतीय पारितोषिक जिंकणाऱ्या ६ भाग्यवान विजेत्यांना 60 लाख रुपये देण्यात आले आहेत. आयुष्याचे ७२ वर्ष सदानंदन यांनी कष्ट केले आणि आता ते कोट्याधीश झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *