महाराष्ट्र

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, अफवा पसरवू नका लता दीदींच्या ट्विटवरहून माहिती

Share Now

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर या गेल्या १५ दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात अतीदक्षता विभागात आहेत. लतादीदींना कोरोना आणि न्युमोनिया झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लतादीदींना जेव्हापासून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांना जाणून घ्यायची आहे.

लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी काल प्रसारित झाली होती, लता दिंदिची प्रकृती स्थिर असून कुठलीही अफवा पसरवू नका त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवू नका असे आव्हान मंगेशकर कुटुंबीयांनी केले आहे. लता दीदींच्या ट्विटर अकाउंटहुन त्यांनी सांगितले कि, लता दीदीच्या प्रकृती मध्ये सुधारणेची सकारात्मक चिन्हे दिसत असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आणि लवकर बरे होण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी प्रार्थना करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *