दहावी – बारावीच्या परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय, परीक्षा ऑफलाईन होणार
दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार असा संभ्रम विद्यार्थी आणि पालकाच्या मनात होता. परंतु , आता हा संभ्रम दूर झाला असून परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. दरम्यान, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे लसीकरण अनिवार्य नसेल.
बारावीची लेखी परिक्षा ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान ऑफलाईन होणार आहे. प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत दरम्यान घेण्यात येणार . कोरोनामुळे जे विद्यार्थी तोंडी किंवा लेखी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या दरम्यान परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल.
दहावीची प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान होणार आहे. यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे उशीरा घेण्यात येत आहेत. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान घेण्यात येणार आहे