क्राईम बिट

त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला नसता तर आणखी एका महिलेचा होणार होता खून

Share Now

औरंगाबाद : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या सुशीला पवार यांना बाळापूर शिवारात बोलावून घेत हत्या केल्याचा प्रकार ९ मे रोजी सकाळी उघडकीस आला होता. खुनापूर्वी १४ वर्षांच्या मुलीनेच थाप मारून सुशीला यांना बोलावून घेतले होते. या चौघांनी आणखी एका महिलेचा तीन दिवसांनी खून करण्याचे ठरवले होते . अशी धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.

हेही वाचा :- “मी आव्हान करतो, पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा..- नितेश राणे यांचा ओवैसीला इशारा

मुकुंदवाडीतील सुशीला पवार यांची नातलग मुलीसह तिच्या प्रियकराने चाकूने गळा चिरून ८ मे च्या रात्री हत्या केली होती. चिकलठाणा पोलिसांनी तो प्रियकर दीपक भताडे, त्याचा मित्र सुनील ऊर्फ राहुल महेर या दोघांसह दोन विधिसंघर्षग्रस्त मुलींना ताब्यात घेतले आहे . दोघांना पोलीस कोठडी मिळाली.

मुलींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे . पोलीस कोठडीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, १७ व १४ वर्षांच्या या मुली मैत्रिणी असून . या दोघींच्या आईसुद्धा मैत्रिणी आहेत.

१७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात सुशीला पवार अडथळा ठरत असल्याने त्यांचा खून करण्यात आला. नियोजन करून दुसऱ्याच्या नावावर खरेदी केलेल्या सीमकार्डवरून १४ वर्षांच्या मुलीने फोन करून सुशीला यांना सांगितले की, १७ वर्षांची मुलगी व तिचा प्रियकर दीपक हे तुम्ही बटईने घेतलेल्या शेतात आहेत.

त्यांनी मला सोबत आणले होते. त्यांच्यापासून दूर येऊन तुम्हाला फोन लावल्याची खोटी माहिती दिली .आणि या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुशीला त्यांची दुचाकी घेऊन बाळापूर शिवारात रात्री ११ वाजेच्या दरम्यान पोहचल्या . तेथे त्यांचा खून झाला. हा खून पचविल्यानंतर सुशीलांची मैत्रीण व १४ वर्षांच्या मुलीच्या नातेवाईक महिलेचाही खून करण्याची योजना त्यांनी बनवलेली होती, असे चौकशीत समोर आले आहे.

 

हेही वाचा :- शेतीला अनुसरून व्यवसायाला उत्तम पर्याय म्हणजे बटेर पालन – संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *