मला अटक झाली नसून मी स्वतः सरेंडर झालो – नीतेश राणे
जामीन मंजूर झाल्यानंतर आ. नितेश राणे यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेना कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी बोलणं टाळलं आहे.
न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणावर मी बोलणार नाही.मला जे बोलायचं होतं मी आपल्याशी बोललो आहे. अजूनही तपास कार्य सुरू आहे , चार्जशीत दाखल व्हायची आहे.
हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी बरा झाल्यानंतर आराम केला नंतर मी आपल्याशी सगळ्यांची निश्चित पद्धतीने बोलणार आहे.
ज्या दिवशी बोलेन त्यादिवशी खूप लोकांचा बीपीचा त्रास होईल. अशी टीका त्यांनी केली.
सिंधुदुर्गाच्या जनतेला माझ्यामुळे त्रास नको तसेच कायदा सुव्यवस्था खराब होऊ नये म्हणून मी सरेंडर झालो. मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करून माझ्या वकिलांशी चर्चा करून स्वतः सरेंडर झालो. मला अटक करण्यात आली नाही. असे आ. नितेश राणे म्हणाले.
सरकार पडण्याची वेळ येते ईडीच्या कारवाई सुरू होतात. आणि अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री आजारी का पडतात त्यांच्यावर कारवाई सुरू होतात तेव्हा त्यांच्याबरोबर चौदा दिवस कोरोना कसा होतो हे प्रश्न आम्ही विचारले तर चालतील का..? अटक झाल्यानंतर आजारी पडले यावर नीतेश राणे चांगलेच संतापले होते.
कोणाच्या तब्येतीबद्दल आरोग्य व्यवस्थेवर असा प्रश्न चिन्ह निर्माण करणं नैतिकतेच्या चौकटीत बसता का याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करायला हवा असे माझे तरी मत आहे. असं नीतेश राणे म्हणाले.
नीतेश राणे याना जामीन मिळल्यानंतर त्यांनी माध्यमांशी आज संवाद साधला.