“मी आव्हान करतो, पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा..- नितेश राणे यांचा ओवैसीला इशारा
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. औरंगाजेबच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्यांनी माथी टेकवल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे.
मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..
याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..
आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!— nitesh rane (@NiteshNRane) May 13, 2022
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे. “मी आव्हान करतो, पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही !!!” असं ट्वीट करत त्यांनी इशारा केला आहे.
या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की,
मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्या मध्ये "नामर्दांचे सरकार आहे"…याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!! pic.twitter.com/FB7pVSOraE
— nitesh rane (@NiteshNRane) May 13, 2022
तसेच राज्यसरकारवर देखील त्यांनी टीका केली आहे. नितेश राणेंच्या दुसऱ्या ट्विटमध्ये असं लिहलं की, “या कारट्या ओवैसीला माहिती आहे का ? की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी, मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”…” असं म्हणत त्यांनी सरकारवरही टीका केली आहे.
हेही वाचा :- शेतीला अनुसरून व्यवसायाला उत्तम पर्याय म्हणजे बटेर पालन – संपूर्ण माहिती