क्राईम बिट

नवर्याकडे फोन घेण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे बायकोने केली आत्महत्या

Share Now

महाराष्ट्रातील पुण्यातून आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. 20 वर्षीय शिवानी गोपाल शर्मा असे मृत महिलेचे नाव आहे.

राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर संतापले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ‘त्यांच्या गरीब विचारांमुळे…’

मोबाईल नसल्यामुळे शिवानीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. शिवानी गेल्या काही महिन्यांपासून पती गोपाल शर्मा यांच्याकडे मोबाईलसाठी हट्ट करत होती. गोपाल एका खाजगी कंपनीत छोटी नोकरी करतो, आर्थिक अडचणींमुळे त्याला मोबाईल विकत घेता आला नाही. मात्र  बायकोला हे न समजल्याने फोन विकत घेण्याचा आग्रह धरत होती.

पाकिस्तानमध्ये महानिरीक्षकांचा पगार किती आहे? भारताची व्यवस्था किती वेगळी आहे? घ्या जाणून

महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली
तिचा हट्ट पूर्ण होऊ न शकल्याने शिवानीने बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  नवरा  गोपाल कामावरून घरी परतला असता त्याला  बायको लटकलेल्या अवस्थेत दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *