पती पत्नी मिळून ओढायचे तरुणांना ‘हनी ट्रॅपमध्ये’ आणि मग…

साताऱ्यातील वाई तालुक्यातील बंटी बबलीचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. युवकांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांची फसवणूक करायची आणि हा सर्व प्रकार चक्क पतीच्या सांगण्यावरुन करून पत्नी तरूणांना जाळ्यात ओढायची.

हेही वाचा :- आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीच्या आत्महत्येचे गूढ उकलणार ?

सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस ठाण्यात बोपेगाव येथील एक मुलगा त्याच्या वडिलांना घेऊन तक्रार दाखल करण्यासाठी आला. मुलाने केलेल्या चॅटिंगच्या आधारावर, व्हिडीओवरून महिलेकडून ब्लॅकमेल केले जात असल्याचे त्याचे म्हणने होते. पोलिसांनी सर्व प्रकरण ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी पहिल्यांदा महिलेला बोलावून या प्रकरणाची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. युवतीच्या मोबाईलवर फोन केला तेव्हा तरूणीने आपण ठाण्याला असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोबाईल ट्रॅक केले. ती बावधन येथील एका रुमवर असल्याचे समोर आले. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु झाली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

हे वाचा : लाल कांद्यापेक्षा पांढरा कांदा खातोय भाव, जाणून घ्या आजचे दर

ओझर्डे येथे राहणारी पुनम मोरे आणि पती हेमंत मोरे या दांपत्यांनी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शक्कल लढवली. पुनमने नोकरदार युवकांना हेरायचे… गोड बोलत फोन नंबर मिळवायचा…आणि नंतर चॅटिंग करत मैत्रीसंबध वाढवायचे असे सुरू होते. अचानक नवऱ्याने पुढे येऊन माझ्या पत्नीला मेसेज कले, तिच्या सोबत संबध ठेवले त्याचे व्हिडीओ चॅटिंग माझ्याकडे आहे असे म्हणत ब्लॅकमेलिंग सुरु करायचे, अशी अनेक प्रकरणे या पुनम मोरे आणि पती हेमंत मोरे यांनी केली. या दोघांनी तब्बल 2 लाख 90 हजारापेक्षा अधिक रक्कम लुबाडली. त्यानंतर पुन्हा दोन लाखाची मागणी केली. त्यानंतर मात्र जितेंद्र जाधव तक्रार देण्यासाठी पुढे आला. या बंटी बबलीचा भांडाफोड झाला

हेही वाचा : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात सापडले असे काही, ऐकून व्हाल थक्क

अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना युवकांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. जागृती पोरे यांनी केले आहे. या बंटी बबलीने अशा प्रकारे फसवलेल्या युवकांची यादी पोलिसांसमोर जाहीर केली आहे. यातील काही युवकांपर्यंत पोलिस पोहचले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *