मतदान दिलं नाही हे राऊतांना कसं कळालं? ते काय ब्रह्मदेव आहेत का?-देवेंद्र भुयार
राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या पदासाठी शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये चुरस होती. मात्र, भाजपाचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला. शिवसेनेला बसलेल्या धक्क्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपावर टीका केली. तसेच त्यांनी राज्यसभेसाठी शिवसेना उमेदवाराला मतदान न केलेल्यांची यादीच सांगितली. यात त्यांनी काही अपक्ष आमदारांची नावे त्यांनी घेतली.
असे मिळेल वैयक्तिक शौचालय, ऑनलाइन करता येणार अर्ज
संजय राऊत यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा देखील उल्लेख केला. त्यांनी शिवसेना उमेदवाराला मत दिलं नसल्याचे संजय राऊत म्हणाले. मात्र, देवेंद्र भुयार यांनी संजय राऊत यांचा आरोप फेटाळला आहे. “संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? त्यांना ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहेत असं वाटायला लागलंय. अपक्षांचे मतदान हे गोपनीय राहतं. मग मतदान मी दिलं नाही हे यांना कसं कळालं?” असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. “मी महाविकास आघाडीत सुरुवातीपासून आहे. हे नंतर आले आहेत. किमान समान कार्यक्रम ठरला त्यावेळी मी सोबत होतो, शिवसेना नंतर आली,” अशी टीका देवेंद्र भुयार यांनी संजय राऊतांवर केली आहे.
एका हेक्टरमध्ये ७६ क्विंटल गव्हाचे उत्पादन देणारं हे वाण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास उपयुक्त
आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं की, मी कुठलाही दगाफटका केलेला नाही. माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे पण माझी वयक्तिक नाराजी नाही. माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न आहेत. आमच्या प्रश्नांसाठी वेळ दिला नाही, त्यावरुन माझी नाराजी नाही. माझी नाराजी मुख्यमंत्र्यांवर होती जी मी उघडपणे व्यक्त केली, नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही तर काय दाऊद समोर मांडायची का? असा सवाल देखील त्यांनी केला.
“शिवसेनेच्या संजय पवारांना ३३ मतं मिळाली ती आमची अपक्षांची होती, ती मतं काही अमेरिकेतून आलेली नव्हती,” असा खोचक टोला भुयार यांनी लगावला आहे. “त्यांनी सांगितलेल्या क्रमानुसार मतदान केलं. माझ्या विरोधात उभे असलेले बोंडे तिकडे निवडणुकीत उभे होते. तरीही मी त्यांच्याकडे कसा जाईल,” असा संतप्त सवाल भुयार यांनी संजय राऊत यांना विचाराला आहे. “संजय राऊत बेछूट बोलत आहेत जे योग्य नाही, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी बोलणार आहे,” असे देवेंद्र भुयार म्हणाले.
संजय राऊत यांनी आज बोलताना म्हटलं की, “आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजारात उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही आणि कुठला व्यापार केला नाही. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असे संजय राऊत यांनी सांगितले.