पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा अपघात कसा झाला.? सोबत असलेल्या मैत्रिणीने सांगितला थरार
पंजाबी अभिनेता दिप सिद्धू यांचा काल कार अपघातात मृत्यू झाला अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती त्याच्यासोबत असलेल्या रीना राय मैत्रिणीने सांगितली.
दीप सिद्धू स्वतः गाडी चालवत होता तर त्याच्या शेजारी त्याची मैत्रीण बसलेली होती. अपघाताच्या काही वेळापूर्वी रीनाचा डोळा लागला आणि तितक्यात कार ट्रकवर धडकली, त्यानंतर दीप सिद्धूची कार जवळपास २० ते ३० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. आणि सिद्धू जागीच मृत्यू झाला तर मैत्रीण रीना जखमी झाली आहे. रिनावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या जबाबात अपघाताची माहिती समोर आली. एअर बॅग मुळे करीनाचा जीव वाचण्याची प्राथमिक माहिती ती पुढे आली आहे.
दीप सिधू पंजाब मधील मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी होता. पंजाबी अभिनेता दीप सिद्धू २०२१ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर प्रकाश झोतात आला.
लाल किल्ल्यावर झालेले हिंसाचारात त्याचं प्रमुख आरोपी म्हणून नाव देखील होतं दिपणे २०१५ मध्ये त्याचा पहिलाच सिनेमा “रमता जोगी” होता. त्याचबरोबर २०१८ मध्ये त्याचा “जोरा दास नम्ब्रिया” हिट झाला होता.