चंद्रपुरात हॉरर हत्याकांड, सेलोटेपने हातपाय बांधून मृतदेह ठेवला शाळेत
चंद्रपूर : चंद्रपुरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह एका इमारतीच्या टॅरेसवर आढलून आला होता. हा मृतदेह निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या हत्याकांड प्रकऱणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केलाय. या तरुणाच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर वार करण्यात आले होते. गळा दाबून आधी या तरुणाचा जीव घेण्यात आला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे हात आणि पाय सेलोटेपचे चिटकवण्यात आले असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केलाय. चंद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेच्या शासकीय इमारतीच्या छतावर 28 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबतची माहिती पोलिसांनी देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर माहिती दिली आहे. पोलिसांच्या तपासातून धक्कादायक खुलासे करण्यात आलेत.
करणवीर बोहोरा विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकार |
चंद्रपूर शहराच्या मध्यभागी ज्यूबली शाळेच्या आवारात एका शासकीय इमारतीच्या छतावर मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह राहुल ठक या 28 वर्षांच्या तरुणाचा होता. राजूरा येथे राहणाऱ्या या युवकाचा खून करण्यात आला होता. राहुलच्या मृतदेहावरील डोक्यावर आणि मानेवर घाव आढळून आले होते. दारुची बाटली डोक्यावर मारून, गळा दाबून राहुलची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. राहुलची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे राहुलचे हात-पाय सेलोटेपने चिटकवण्यात आले होते.
इंडोनेशियाने घेतला मोठा निर्णय, खाद्यतेलाच्या किमतीत होणार मोठी कपात!
चंद्रपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय. तसंच राहुलचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवण्यात आलाय. या घटनेचे गांभीर्य बघता शहर पोलिसांनी तपासही तातडीनं सुरू केलाय. मृतक राहूल ठग या युवकाचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. मारेकरी मागील एक वर्षांपासून त्याच्या मागावर होते. याआधीही त्याला मारहाण करण्यात आली होती. पण त्याच्या हत्येचा कट जुळत नव्हता, अशीही माहिती पोलिसांनी दिलीय. मात्र यावेळी आरोपीने पूर्वनियोजित कट रचून राहुलचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीही तयारी केली होती.