होळी आणि धुलिवंदन साजरी करण्याबाबत गृहखात्याची नवी नियमावली जारी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याचसोबत १७ आणि १८ तारखेला होळी धुलीवंदन साजरा केला जाणार असून राज्य शासनाने काल दिनांक १६ बुधवार रोजी काही निर्बंध घातले होते. मात्र या निर्बंधाबाबत विरोधकांनी आक्षेप घेतल्याने गृह खात्याने नवी नियमावली जारी केली आहे.
गृहखात्याने खालील प्रमाणे नियमावली जारी केली
– कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणुक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.
– एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी
– होळी, शिमगा निमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.
– कोवीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानागरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे