हिंगणघाट जळीत हत्याकांड दोषींला जन्मठेपेची शिक्षा, सरकारी वकील उज्वल निकम यांची प्रतिक्रिया
हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणी विक्की नगराळेला जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती. यावर सरकारी वकील उज्वल निकम यांनी निकालानंतर माध्यमांशी संवाद साधला.
हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणातील दोशीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे दिनांक ३ फेब्रुवारी २०१९ ला अटक करण्यात आली होती. दोशीला दोन वर्षाचा कालावधी त्याला शिक्षेत सूट मिळणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप असा होतो.
आज मयत अंकिता जाऊन दोन वर्ष झालेली आहेत आणि आज पासून त्यालाही जन्मठेपेची शिक्षा कायद्याच्या भाषेत मरेपर्यंत जन्मठेप असा होतो आणि पाच हजार रुपयांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीश दंड ठोठावला आहे.
या संपूर्ण खटल्याच्या कामकाजाला वर्धा पोलीस अधीक्षक होळकर जी त्यांचे सर्व सहकारी यांनी या खटल्यामध्ये योग्य तो बंदोबस्त ठेवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील कोठे निर्माण होऊ शकला नाही. हे देखील या खटल्याच आजचा एक वैशिष्ट्य आहे आणि आजचा निकाल बरोबर आज संध्याकाळचा न्यायालयाने घोषित केलेला आहे.असे सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले.