अखेर हिंदूस्तानी भाऊला जामीन मंजूर
मुंबई : सोशल मिडियावर प्रसिद्ध हिंदुस्तानी भाऊ उर्फ़ विकास पाठकला अखेर जामीन मंजूर झाला आहे. धारावीमधील विद्यार्थी आंदोलनाप्रकरणी विकासला १ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.
अटक केल्यानंतर विकासला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर विकास हा न्यायालयीन कोठडीत होता. तेव्हापासून कोठडीत असलेल्या विकासला अखेर ३० हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती विकासचे वकील अनिकेत निकम यांनी दिली आहे.
काय होते प्रकरण ?
दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षांच्या निर्णयाविरोधात मुंबईतील धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घालत शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे हे आंदोलन उभे राहिल्याचे समोर आल्यानंतर धारावी पोलीस ठाण्यात हिंदुस्थानी भाऊ आणि इकरार खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात हिंदुस्थानी भाऊ आणि इकरार खानला अटक करण्यात आली होती.