हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील – खा. इम्तियाज जलील

कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे मत स्पष्ट केले. गेल्या काही दिवसापूर्वी एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. हिजाब हा मुस्लिम धर्मात अनिवार्य नसल्याचंही न्यायालायने म्हटलं आहे.

यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील, असं मत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं असून, देशात राहणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचा आणि त्याच्या मतानुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले .

हिजाब बाबत कर्नाटक उच्च न्यायालयानं आज निर्णय दिला. तसेच महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र, या निर्णयाला विरोध केला आहे.

हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील असे त्यांनी मत आहे. दरम्यान, हिजाबबाबत उच्च न्यायाल्याने दिलेला निर्णय निराशाजनक आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असेलच असे नाही. त्यामुळं जर कोणी सर्वोच्च न्यायालयात जात असेल तर आम्ही त्याला समर्थन देऊ, असे इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *