देश

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, पाण्यात गेली जळती चिता वाहुन, पहा व्हिडिओ

Share Now

उत्तराखंडमध्ये पावसामुळे हाहाकार माजला आहे . गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हल्दवणीतही गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी हल्दवणी येथे पावसामुळे अंत्यसंस्कारासाठी आणलेले तीन मृतदेह पाण्यात वाहून गेले. प्रत्यक्षात काही तासांच्या संततधार पावसाने नदी नाले तुडुंब भरले आहेत. त्याचबरोबर गौला नहीच्या पाण्याच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

मुलाने जन्मदात्या पित्याला संपवलं, सावत्र आईला ही केलं जखमी

त्यामुळे गौलापार, गेठिया आणि काठगरिया परिसरातून अंत्यसंस्कारासाठी आणलेले तीन मृतदेह पाण्याची पातळी वाढल्याने पाण्यात वाहून गेले. अचानक पाण्याची पातळी इतकी वाढली की जीव वाचवण्यासाठी सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. गौला नदीत 14000 क्युसेकहून अधिक पाणी सोडण्यात आले आहे. यासोबतच सर्व धरणांचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. काठगोदाम पोलिस आणि प्रशासनाने आजूबाजूच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, तसेच पोलिसांनी लोकांना नद्यांच्या काठावर न जाण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नैनिताल जिल्ह्यातील डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे गौला नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आहे.

केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधेसाठी 14 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला दिली मंजुरी

चिता पाण्यात बुडाली

डेहराडूनमध्ये आज मुसळधार पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील डेहराडून, टिहरी, पौरी, नैनिताल, चंपावत आणि उधमसिंहनगर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागाने अतिवृष्टीचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *