newsमहाराष्ट्र

पोलीसांमुळे करणार होता ‘तो’ व्यक्ती आत्महत्या, पण…

Share Now

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालय सोमोर आज एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती समोर येत आहे. सय्यद आतार असे या इसमाचे नाव सांगितले जात आहे. त्यांचा विक्रीचा माल चोरीला गेल्या बाबद ते तक्रार देण्यास पोलिसात गेले होते. तेथे त्यांची तक्रार कोणी घेतली नसल्याचे आतार यांनी सांगितले. त्यामुळे ते कंटाळून पोलीस आयुक्तालय सोमोर आत्महत्या करणार होते असे समजत आहे.

सय्यद आतार हे कॉस्मेटिक आणि किरकोळ सामान आपल्या सायकलवर फेरी करून विकतात. एका दुकानात त्यांनी सामान ठेवले होते तेथून ते गहाळ झाले. या बाबद त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची दखल कोणीच घेतली नाही असे त्यांनी सांगीतले. सकाळी ते एक फलक आणि खिस्यात विषारी औषधाची बॉटल घेऊन पोलीस आयुक्तालया समोर आले होते. यावर पोलिसांनी त्यांना वेळीच थांबवले आणि सोबत घेऊन गेले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *