औरंगाबाद शहरातील ‘तो’ भोंदूबाबा पोलिसांच्या हाती
औरंगाबाद : भारतात अंधश्रद्धा निर्मूलन सारखे सक्तीचे कायदे असले तरी देशभरात लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहे. अशीच घटना औरंगाबादेतही घडली, शहरात बेगमपुरा भागातील एका महिलेचे डोके फार दुखत होते म्हणून अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन फरक पडत नसल्याने ती एका भोंदू बाबाकडे गेली. भोंदूबाबाने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर तिला कळताच तिने पोलिसात धाव घेतली. तेव्हा पासून फरार असलेला हा बाबा आता बेगम पोलिसांच्या हाती आलेला आहे.
हाती आलेल्या माहिती नुसार, महिला जेव्हा बाबा कडे गेली त्यावेळी याने तुझ्या घरी येऊन बघावे लागेल तुझ्या घरावर भुतांचा प्रकोप आहे असे सांगितले. २७ जुलै २०२१ रोजी भोंदू पहिल्यांदा त्या महिलेच्या घरी गेला. भुतांचा प्रकोप कमी करण्यासाठी तुम्हाला कस्तुरी घेऊन त्याने ते भूत काढावे लागेल त्यासाठी ३ लाखाचा खर्च येईल असे या भोंदूने महिलेला सांगितलॆ.
दरम्यान, २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत महिलेने भोंदूला संपूर्ण पैसे दिले. १६ ऑगस्टला महिलेला त्याने खोलीत नेत तिच्या घरच्यांना बाहेर काढले आणि म्हणला “भूत जाण्यासाठी पूजा करावी लागते त्यासाठी महिलेला एकांतात नेऊन विधी करावा लागतो.” त्यावर संपूर्ण कुटुंब घरा बाहेर गेले. त्याने महिलेला भुलीचे औषध देत अत्याचार केला. तसेच त्याने दुसऱ्या दिवशीही असेच कृत्य केले. संपूर्ण शुद्ध आल्या नंतर महिलेलने संपूर्ण प्रकार घरी सांगितलं. ७ डिसेंबर रोजी तिने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तब्बल ४५ दिवस त्याने पोलिसांना घुमवले. अखेर तो बेगमपूर पोलिसांच्या हाती लागला.