गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सराईत दुचाकीचोर गजाआड
औरंगाबाद : सध्या शहरात शहरामध्ये मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका चोराला औरंगाबाद गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक शेळके आणि त्यांच्या सहकार्यांनी हि कामगिरी केली असून सराईत गुन्हेगार चंदू उर्फ चंद्रकांत विठ्ठल मोरे (४० रा, मुकुंदवाडी गाव ) याला काल (दि १८) अटक केली. तसेच त्याच्याकडून २ दुचाकी असा ७५,००० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हाती आलेल्या माहिती नुसार, शेळके आणि त्यांच्या पथकाला या चोरीच्या गाड्यांची गुप्त माहिती मिळाली. त्याची दाखल घेऊन उपनिरीक्षक शेळके हे मुकुंदवाडी येथील पीव्हीआर टॉकीस येथे सापळा रचून या चोराला पडले. त्याच्या ताब्यातून ग्रे कलरची एक्टीव्ह एम एच २० बीबी ५२१३ तसेच होंडा कंपनीची ड्रीम युग एम एच २० डीपी ३४१७ या चोरीच्या गाड्या मुकुंदवाडी येथे विकण्यासाठी थांबलेले होते. त्यातून एक्टीव्ह एम एच २० बीबी ५२१३ हि उस्मानपुरा तर एम एच २० डीपी ३४१७ हि उस्मानपुरा या भागातून चोरीला गेली होती. दरम्यान, या आरोपीला उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये हजर करून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.