सरकारने 4% ने वाढवला DA, गरिबांना आणखी 3 महिने मिळेल मोफत धान्य, मंत्रिमंडळाने दिली मंजूरी
गरीब कल्याण योजना: मंत्रिमंडळाने मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे 62 लाख पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये 4 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सीएनबीसी टीव्ही-18 ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. 4 टक्क्यांच्या वाढीसह आता डीए 38 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेला RBI ने ठोठावला 50 लाखांचा दंड
गरीब कल्याण योजना आणखी ३ महिने चालणार आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गरिबांसाठी मोफत अन्नधान्याची योजना म्हणजेच गरीब कल्याण योजना तीन महिन्यांसाठी वाढवण्याच्या सरकारच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी 18 अब्ज डॉलरचा बोजा पडेल.
या वर्षी मार्चमध्ये, मंत्रिमंडळाने 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत डीएमध्ये 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती. अशा प्रकारे, त्यावेळी डीए मूळ उत्पन्नाच्या 34 टक्के झाला होता.
राज्यात पावसामुळे कापूस पिकाचे मोठं नुकसान,अतिवृष्टीमुळे 27 लाख शेतकरी संकटात
या तारखेपासून तुम्हाला वाढीव डीए मिळू शकतो
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकार लवकरच याबाबत घोषणा करू शकते. हा वाढीव डीए १ जुलै २०२२ पासून लागू केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, डीए वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार 6840 ते 27,312 रुपयांपर्यंत वाढणार आहे.
कोरोना कालावधीच्या DA वर निर्णय देखील शक्य आहे
कोरोनाच्या काळात रोखून ठेवलेली १८ महिन्यांची डीए थकबाकी देण्याचा निर्णयही सरकार घेऊ शकते, असे वृत्त आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकरकमी दीड लाख रुपये मिळू शकतात. सुमारे दोन वर्षांपूर्वी बंद झालेल्या या डीएच्या रकमेसाठी केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळ प्रतीक्षा करत आहेत.