महाराष्ट्रराजकारण

राज्यपाल भगतसिंग सिंग कोश्यारी यांनी चुकीचा इतिहास सांगितला ; छत्रपती उदयनराजे यांनी केली टीका

Share Now

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे या वक्तव्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले त्यांच्यावर शिवप्रेमींनीकडून टीका होत असून खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यपालांवर टीका केली आहे.

उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट करून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर टीका केली. उदयनराजे म्हणाले की राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुदत्त रामदास हे कधीही गुरु नव्हते हा खरा इतिहास आहे तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग दोषारी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देऊन चुकीचा इतिहास सांगितलं त्यामुळे शिवप्रेमीकडून संताप व्यक्त केला जात आहे.

तसेच राज्यपाल यांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वास्तव्य करायला हवी होती त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींचा संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत तरी राज्यपाल को शादी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांन बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे दिसून येत असून समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोणी विचारेल असे विधान त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं.

तसेच समर्थ रामदास यांच्या विना शिवाजी महाराजांना कोण विचारेल ? असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलं. आपल्या देशात गुरूंची परंपरा आहे. म्हणून ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असे देखील कोषारी म्हणाले, औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोशारी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव, मराठी भाषा दिन आणि श्री दास नवमी या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *