शासकीय कर्मचारी दोन दिवस संपावर, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
नोकर भरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार आहे. या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार असून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन दिवशी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे. या आंदोलनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत.
या दोन दिवसीय संपात सहभागी होणार्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यावर काम नाही वेतन नाही हे धोरण राबविण्यात येणार आहे. संप सुरू झाल्यानंतर दुपारी 12 आणि 2 वाजता संपाच्या संदर्भात माहिती मंत्रालयात कळविण्यात यावी असे देखील परिपत्रकात म्हटले आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकारी संघटना यांच्यात बैठक पार पडली या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मार्ग निघाला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक होणार आहे या बैठकीला अजित पवार मुख्य सचिव आणि कर्मचारी तसेच अधिकारी संघटना उपस्थित राहणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय.?
– राज्यातील अडीच लाखाहून अधिक असलेले रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने न भरता नियमित वेतनश्रेणी वर भरावी.
– केंद्र आणि अन्य 25 राज्याप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे.
– सातवा वेतन आयोग थकबाकीच्या तिसरा आता तातडीने मिळावा
– सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रात लागू केलेले वाहतूक आणि इतर भत्ते राज्यातही लागू व्हावे
– विविध खात्यातील रखडलेल्या भरती प्रक्रिया विनाविलंब कराव्यात
– महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात
– सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना चिडते सातव्या वेतन आयोगा अंतर्गत एस 20 मर्यादा काढावी