महाराष्ट्रराजकारण

गुगलने ‘संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ मॅपवरून हटवले, कारण…

Share Now

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला ठाकरे सरकार असताना मान्यता मिळाली होती, मात्र त्यानंतर शिंदे आणि भाजप सरकार आला, त्यांनी हा निर्णय रद्द केला आणि दुसऱ्याच दिवशी बैठक घेऊन पुन्हा या निवार्णायाला मान्यता दिली. त्यावरून अनेक राजकीय टीकास्त्र आपण पहिले आहे. मात्र आता या वादात थेट गुगलने उडी घेतल्याचा पाहायला मिळाले होते.

मुलांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देतानाच व्हिडिओ व्हायरल, दोन आरोपी अटक

‘गूगल मॅप’ जे आपण रास्त, ठिकाण शोधण्यासाठी वापरतो त्यावर औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर औरंगाबाद’ तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव उस्मानाबाद’ असे दाखवत होते. मात्र आता गुगलने संभाजीनगर आणि धाराशिव हटवून आता फक्त अरंगाबाद आणि उस्मानाबाद असेच ठेवले आहे.या वादावरून औरंगाबाद या नावाला समर्थन देणाऱ्या काही संघटना गूगलवर कायदेशीर कारवाई करणार होत्या त्यामुळे गुगलने हे नाव हटवले असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान महाराष्ट्रात नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी केंद्राची मंजुरी आणखीन बाकी आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या शिवाय गुगलने नाव बदलले होते.

सरकारी नोकरी २०२२ :कोल इंडियामधे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, 1050 रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख coalindia.in वर अर्ज करा.

औरंगाबादचे नाव मॅपवर बद्दल म्हणून खासदार जलीलने विचारला होता गुगलला सवाल

“कृपया गुगल मॅप आपण सांगू शकता की तुम्ही तुमच्या नकाशात माझ्या शहराचे औरंगाबादचे नाव कोणत्या आधारावर बदलले आहे! ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा दुष्प्रचार खेळला गेला आहे, त्यांना तुम्ही स्पष्टीकरण द्यावे” असे जलील म्हणाले

३४ वर्षां पासून शिवसेनाने कडून ‘संभाजीनगर’ असा उल्लेख

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ साली औरंगाबादच्या सभेत शहराच्या नावाची संभाजीनगर म्हणून पहिल्यांदा उल्लेख केला. तेव्हापासून शिवसेनेकडून शहराचा उल्लेख संभाजीनगर म्हणूनच केला जातो. अनेकदा शिवसेना मंत्राच्या शासकीय कार्यक्रमात सुद्धा संभाजीनगर म्हणूनच उल्लेख केला गेल्याचे सुद्धा समोर आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *