गोव्याला फिरायला जाताय ? निर्बंध एकदा वाचाच ..
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी दरवर्षी होत, एकीकडे देशात वाढती कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश या सारख्या राज्यत निर्बंध लावले जात आहेत. त्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात येणाऱ्या नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे, पर्यटकांनी नियम पाळले नाही नाईट कर्फ्यू लावावा लागेल असे सांगितले.
गोवा राज्यात ख्रिसमस आणि नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २५ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यत गोव्यात मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केलं जातं. मात्र पर्यटक किंवा गोव्यातील नागरिकांनी सेलिब्रेशन करताना कोव्हिडचे नियम पालन करणे गरजेचं आहे असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
गोव्यात सेलिब्रेशनवर कुठेही निर्बंध लावण्याचा कुठलाही निर्णय अद्याप तरी झाला नाही. मात्र गोव्यातील सेलिब्रेशन कोव्हिडच्या नियमानुसार करण्यात यावं असं आवाहन करण्यात आलं आहे.