OnePlus 10T मिळवा फक्त २४४९ रुपयात, पहा काय आहे ऑफर
OnePlu ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 10T भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन मजबूत कॅमेरा सेटअप आणि वायरलेस चार्जिंगसह येतो. यात फास्ट चार्जिंगसह अनेक फिचर्स आहेत. Amazon वर या मोबाईलची किंमत 49,999 रुपये असली तरी आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने OnePlus चा हा नवीनतम स्मार्टफोन २५०० रुपयांपेक्षा कमी खर्च करून घरी आणला जाऊ शकतो.
साखर निर्यात: भारतातून साखर निर्यात बंदी ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली
Amazon वर लिस्ट केलेल्या या फोनला 49999 रुपयांच्या किमतीत 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. समोरच्या बाजूला अमोलेड पॅनल देण्यात आला आहे. बायोमेट्रिक अनलॉक प्रणालीच्या रूपात, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
OnePlus 10T चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 10T च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. हे 120 Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येते. तसेच, यात 2412 X 1080 पिक्सेल रिझोल्यूशन दिले आहे. यामध्ये 10 बिट कलर डेप्थ वापरण्यात आली आहे. हे HDR 10 Plus ला सपोर्ट करते.
ऑफिसमध्ये जास्त वेळ काम केल्याने होतात ‘हे’ शारीरिक परिणाम
OnePlus 10T रॅम आणि प्रोसेसर
OnePlus 10T च्या रॅम आणि प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट वापरण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, यात 4800 mAh बॅटरी आहे, जी 150 वॅट सुपर वूक चार्जिंगसह सुसज्ज आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
OnePlus 10T कॅमेरा सेटअप
OnePlus 10T च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, बॅक पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 50 मेगापिक्सेल कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरासह Sony IMX 766 सेन्सर आहे, जो 120 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू कॅप्चर करू शकतो. तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा आहे. 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.