हाऊ इज द जोश ? आता ‘ती’ सुद्धा म्हणेल “हाय सर”!

पुरुष आणि स्त्रियांच्या मधली असमानतेची दरी पूर्वीपासूनच मोठी आहे. मग तो समान हक्कांचा विषय असेल किंवा साक्षरता दर असेल.
१९९१ साली महिलांचा साक्षरता दर होता ३९% , सन २०२० मध्ये तो वाढून ५३.% झाला. यातच पडणारा एक प्रश्न म्हणजे देशभक्तीचाही . देशभक्ती म्हणजे नेमकं काय? आणि देशभक्ती दाखवण्यासाठी फक्त मुलंच पात्र का असू शकतात? मुली का आपले देशप्रेम सिद्ध करू शकत नाहीत? त्यांना थेट युद्धात जात येईल? त्या आपले युद्ध कौशल्य सिद्ध करू शकतील ? यस… हे होणार आणि लवकरच होणार !

नुकताच सुप्रीम कोर्टाने एन.डी. ए मध्ये आता मुलीही प्रवेश करू शकतात असा निर्णय दिला. परंतु आता पर्यन्त भारतीय संरक्षण दलात महिला नको असं स्पष्टपणे निश्चित जरी नसलं तरीही यासाठी सकारात्मक प्रयत्नही होताना दिसत नाहीत.
एन.डी.ए म्हणजे नॅशनल डिफेंस अकॅडमी! भारतीय सेना (Army), वायुसेना (Air Force) किंवा नौसेनेत (Navy) प्रवेश होण्याचा मार्ग. आतापर्यन्त या परीक्षेसाठी फक्त पुरुष उमेदवारच पात्र होते मात्र यानंतर महिला देखील ही परीक्षा देऊ शकतात. NDA ची परीक्षा ही वर्षातून दोनदा घेण्यात येते ! एनडीए – १ ही एप्रिल दरम्यान तर एनडीए – २ ही सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येते. केवळ भारतातीलच नाही तर नेपाळ, भूतानचे नागरिकही परीक्षा देऊ शकतात. भारतात कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या उद्देशाने बर्मा, श्रीलंका, पाकिस्तान आणि पूर्व आफ्रिकन देश केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे आणि इथियोपिया किंवा व्हिएतनाममधून स्थलांतरित झालेली भारतीय वंशाची व्यक्ती देखील पात्र आहे.
दर वर्षी जवळ- जवळ २ लाख ५० हजार उमेदवार हे एनडीए मध्ये जाण्यासाठी UPSC ची परीक्षा देतात त्यापैकी ६००० विद्यार्थी इंटरव्ह्यू राऊंड पर्यंत जातात पण त्यापैकी केवळ ३०० विद्यार्थीच एनडीएसाठी निवडले जातात.
पण या ३०० मध्ये येण्यासाठी कोणत्या पायऱ्या चढाव्या लागतील?
मुलींना आता जरी प्रवेश मिळाला असला तरीही,मुलांसाठी आणि मुलींसाठी सारखीच पात्रता आहेत. जसं अविवाहित असणं अनिवार्य आहे. तसच वयोगटाची मर्यादा ही साडे १६ ते साडे १९ इतकी सक्तीची आहे. उमेदवाराने सक्तीचे १२ पर्यंतचे शिक्षण घेतलं असलं पाहिजे. एनडीएमध्ये प्रवेश केल्यानंतर आर्मी, एअर फोर्स आणि नेवी मध्ये जाता येते. एअर फोर्स आणि नेवी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच बारावीत सायन्स असणं अनिवार्य आहे. तर आर्मी मध्ये जाण्यासाठी सायन्स नसलेले देखील प्रवेश करू शकतात.
आर्मी – सैन्य कॅडेट्स ला पुढील ट्रेनिंग साठी देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (आयएमए),तर एअरफोर्स साठी हैद्राबादच्या डंडीगल येथील एअर फोर्स अकादमीला (एएफए) आणि केरळच्या एझीमाला येथील इंडियन नेव्हल अकादमी (आयएनए) मध्ये नौदल कॅडेट्स पाठवले जातात.आता मुलींना प्रवेश मिळणार म्हटल्यावर याची तयारी सुरु करण्यात आली आहे, यासाठी पात्रता निकष आणि चाचणी पद्धतीवरही विचार सुरु झाला आहे. असा अंदाज आहे की ,जवळ जवळ 3-4 लाख विद्यार्थिनी NDA ची परीक्षा देऊ शकतात ! २०२२ मध्ये याची सुरुवात होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *