बचके ! तोटाही अन फायदाही
बचके ! तोटाही अन फायदाही
गेमिंग इंडस्ट्री वाढतेय …
कोरोना काळ जितका चॅलेंजिंग होता तेवढाच डिजिटलच्या दुनियेत क्रांती घडवणारा देखील होता. मग एडिटेक असेल,सोशल मीडिया असेल किंवा काम करण्याची पद्धत असेल, सगळं बदललंय बदलतंय आणि पुढे आणखी बदलणार. या सगळ्यांमध्ये आणखी एका सेक्टरने विळखा घातलाय तो म्हणजे गेमिंग सेक्टरने ! कोरोना काळात आपल्याला एका नवीन जगाची ओळख झाली आहे. मात्र या जगात हे सेक्टर अजगराप्रमाणे आहे, जी नवीन पिढीच्या पिढी गिळंकृत करू शकते. भारतात या सेक्टर मध्ये विलक्षण वाढ झाली आहे. ही इंडस्ट्री थोडी थोडकी नाही तर तब्ब्ल ९३० डॉलर्स पर्यंत गेली आहे.
वर्ष २०२० च्या सुरुवातीच्या ९ महिन्यांमध्ये गेमिंग सेक्टरची वाढ होण्याची सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास ७.३ अब्ज गेम्स डाउनलोड करण्यात आले. भारतात जवळपास ५०% लोकसंख्या हि २५ वर्षाखालील आहे, आणि ६०% गॅमेर्स हे गॅमेर्स सुद्धा २५ वर्षाखाली आहेत. म्हणजे युवकांचा एक मोठा भाग या मध्ये सहभागी आहे. मार्च २०२० पर्यन्त गेमिंग यूजरबेस ची संख्या ३६५ दशलक्ष पार गेली.
एका मीडिया रिपोर्ट नुसार ८५% गॅमेर्स हे मोबाईल चा वापर करतात,११% पिसी तर ४% टॅबलेट यूजर्स आहेत. ४G हायस्पीड डेटा, दर ववर्षी वाढत जाणाऱ्या स्मार्टफोन यूजर्स, आणि जगातील सर्वात कमी डेटा ट्राफिक मुळे गेमिंग इंडस्ट्री ला भरभराट आली आहे. ३४ दशलक्ष रोज pubg खेळतात. BARC च्या रिपोर्ट नुसार पहिले भारतीय गेमिंग वर १५१ मिनिट खर्च करायचे तर आता तो वाढून २१८ मिनिटे खर्च करतात. गेमिंग हे गाव, शहर, प्रांता पलीकडे जाऊन आज जगभर गॅमेर्स ला कनेक्ट करत आहे.
या गेमिंग च्या गेमिंग मध्ये मोठा भाग हा जाहिरातींचा सुद्धा आहे. भारतात ६०% जास्त वाढ झालीं आहे मागच्या ३ वर्षांमध्ये आणि ही वाढ कमी होत जाईल याचा अंदाज येणं पण सध्या कठीण दिसत आहे. जर अशीच वाढ होत राहिली तर लवकरच गेमिंग सेक्टर इंडियन बॉक्स ऑफिस ला लवकरच टेकओव्हर करेल. मोठा रेव्हेन्यू हा जाहिरातींमुळे कमावण्यात येतो. हे थांबवता येणे अशक्य आहे. या वाढत्या गेमिंग इंडस्ट्री ला बघता,ही शक्यता आहेकी भारत सरकार लवकरच या इंदूस्ट्रीत मोठा हस्तक्षेप करेल आणि काही निर्णय देखील घेईल. येत्या वर्षात गेमिंगला नवीन करिअरची चालना देण्यासाठी सरकार लवकरच शिक्षण आणि शैक्षणिक इंटरफेसची स्थपणा करेल अशी अपेक्षा आहे.