MPSC च्या परीक्षेत विचारला मजेशीर प्रश्न; पाहा तुम्हाला सुचतय का उत्तर ?
MPSC च्या परीक्षेत विचारला मजेशीर प्रश्न; पाहा तुम्हाला सुचतय का उत्तर ?
एमपीएससी परीक्षा 2024 मध्ये ‘दारूपान’ावर प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आणि चर्चा
एमपीएससीच्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये एक प्रश्न विचारला गेला, जो सध्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 1 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या परीक्षेत, पेपर 2 मध्ये मद्यपानावर एक प्रश्न विचारला गेला, जो विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा ठरला. प्रश्न असा होता की, “तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. तुम्ही काय कराल?”
सीता स्वयंवरात ठेवलेले शिवधनुष्य प्रभू राम यांच्या आधी कोणी उचलले?
या प्रश्नाचे पर्याय हे विद्यार्थ्यांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया निर्माण करणारे होते. एक पर्याय म्हणजे, “मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांना मला दारू पिण्यास मनाई केली आहे,” तर दुसरा पर्याय “दारू पिण्यास नकार देईन,” होता. याव्यतिरिक्त, एक पर्याय “फक्त तुमचे मित्र मद्यपान करत आहेत म्हणून मद्यपान करेन,” आणि “नकार देईन आणि त्यांना खोटे सांगेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे,” देखील दिला गेला होता.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? भाजप नेत्याचा खुलासा, चर्चेला उधाण!
या प्रश्नामुळे अनेक विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भविष्यातील सरकारी अधिकारी म्हणून उमेदवारांची विचारशक्ती तपासण्याच्या हेतूने हा प्रश्न विचारला गेला असावा, परंतु त्याने विद्यार्थ्यांमध्ये उलट नकारात्मक भावना निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांचा असा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय होते, हे स्पष्ट नाही, अशी टीका सोशल मीडियावर देखील केली जात आहे.
अजित पवारांकडून शिंदेंच्या गावी जाण्यावर स्पष्टीकरण, बघा काय म्हणाले ?
एमपीएससीने अशा प्रश्नांची आवश्यकता होती का, यावरही सवाल उपस्थित केला जात आहे. भविष्यात अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमता आणि विचारशक्तीला महत्त्व देणाऱ्या परीक्षा पद्धतीवर आता गंभीर चर्चा होऊ लागली आहे.