वारंवार बूस्टर डोस देणे चांगले नाही, WHO ने दिली माहिती
नेदरलँड : कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट ओमायक्रोन आता जगभरात थैमान घालत आहे. यावर अनेक देशांनी कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याचे ठरवले आहे. याच निर्णयांना पाहून जागतिक आरोग्य संघटना आणि औषधी नियामक संस्थेच्या तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, कोरोना सोबत आपल्याला जगायला शिकावे लागेल. कोरोनाचा अंत कधी होईल हे सांगणे कठीण आहे. असे ते म्हणले. तसेच कोरोनाच्या बूस्टर डोस बद्दल संभ्रम व्यक्त केला आहे. वारंवार लसीकरण करणे चांगले नाही असा दावा देखील WHO ने केला आहे.
“ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगातील आरोग्य व्यावस्थेवर ताण आला आहे.आपण आपण महामारीत जगत आहोत. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता की, यानंतरच्या दोन महिन्यात यूरोप खंडातील अर्ध्याहुन अधिक व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटीव्ह होण्याचा अंदाज आहे. तसेच वारंवार बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही.” असे युरोपीयन मेडिसिन एजन्सी (EMA) चे लसीकरण प्रमुख मार्को केवलेरी म्हणाले.