ट्विटरच्या नावाने चक्क महिला वकीला कडून मागितले चाळीस हजार, कारण ऐकून व्हाल थक्क
आज काल चारसोबीसी करणारे वेगळीच शक्कल लढवतात. अमिषं दाखवून फसवणुकीचे अनेक प्रकार रोज समोर येत असतात तर काही भीती पोटी समोरही येत नाही आणि सध्या सोशल मीडिया वरून फसवणूक कारण म्हणजे या चोरांचा सगळ्यात सोप्पा मार्ग, असाच फसवणुकीचा एक प्रकार आता मुंबईत समोर आला आहे. ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय करण्याच्या नावावर ही फसवणूक केली गेलीय. ती ही एक प्रसिद्ध महिला वकिलाची.
प्रसिद्ध महिला वकील आभा सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला असून त्यांनी अज्ञात व्यक्तिविरोधात मुंबईच्या वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपीनं सिंह यांना सांगितलं की, ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय करुन देईल आणि त्यामुळं त्यांचे फॉलोअर्सही वाढतील.
२९ मार्च रोजी वकील आभा सिंह यांच्याशी आरोपीनं सोशल मीडियावरुन बातचीत केली. त्यावेळी त्यानं सिंह यांना त्यांचं ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय करुन देण्याचं आणि त्यामुळं त्यांचे फॉलोअर्सही वाढतील असं सांगितलं. आरोपीनं महिला वकिलाच्या ट्विटरची माहिती घेत त्यांचं ट्विटर हॅक देखील केलं असल्याचा आरोप आहे.
सदर आरोपीनं अकाऊंट हॅक करत वकील आभा सिंह यांचा डीपी बदलवून तिथं एका मुस्लिम व्यक्तिचा फोटो लावला आणि अकाऊंटचे हक्क परत देण्यासाठी आभा सिंह यांच्याकडे ५०० डॉलर्सची मागणीही केली, असा आरोप सिंह यांनी केला आहे. या प्रकरणी वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे. आता पोलिस याबाबत तपास करत आहेत.