क्राईम बिटदेश

मुंबईत 5 कोटी रुपयांच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक, 4.5 किलो सोनेही जप्त

Share Now

कस्टम अधिकाऱ्यांनी एका विदेशी महिलेला पाच कोटींच्या ड्रग्जसह अटक केली आहे. या 50 वर्षीय परदेशी महिलेकडून 500 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. आरोपी महिलेला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे एवढेच नाही तर डीआरआयच्या मुंबई पथकाने पाच आरोपींना सोन्याची तस्करी करताना पकडले आहे. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईची माहिती कस्टम विभागाने दिली आहे.

या’ देशात 10 मुलांना जन्म देण्यासाठी 13 लाख रुपये मिळणार, जाणून घ्या काय आहे ‘मदर हिरोईन’ पुरस्कार

कस्टम्स एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) च्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अरायव्हल गेट हॉलजवळ आरोपी महिला बिंटू जानेहला थांबवून तिची चौकशी केली. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून ही महिला मुंबईत पोहोचली होती. आरोपी महिलेने तिच्या बॅगेत कोकेन लपवले होते.संबंधित महिला हे कोकेन मुंबईतील एका व्यक्तीला देणार होती.

मुंबई विमानतळावर गुन्ह्याची कबुली, गरिबीमुळे झाली चूक

चौकशीदरम्यान बिंटू जानेहने सांगितले की ती एका गरीब कुटुंबातील आहे. माल पोहोचवण्याच्या बदल्यात मुंबईतील एका व्यक्तीला कमिशन देण्याचे अज्ञात व्यक्तीने सांगितले. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे हे पाकीट त्याच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र आरोपी महिलेने हे पाकीट कोणाला डिलिव्हरी करणार होते याबद्दल काहीही माहिती असण्यास नकार दिला. संबंधित महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे कस्टम अधिकारी या नेटवर्कशी जोडलेल्या इतर लोकांची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेळीपालन: शेळ्यांच्या या दोन जाती घरी आणा, काही महिन्यांत होईल दुप्पट नफा

2 कोटींचे सोनेही जप्त, 5 आरोपींकडून 4.5 किलो जप्त

याशिवाय बुधवारी सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 2 कोटी रुपये किमतीचे 4.5 किलो सोने जप्त केले. कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी तीन वेगवेगळ्या प्रकरणांपैकी एका प्रकरणात तीन प्रवाशांना कालिकत-मुंबई फ्लाइटच्या टॉयलेट आणि सीटमध्ये लपवून सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आली होती. हे तिन्ही प्रवासी शारजाहून मुंबईत आले होते.

उर्वरित दोन घटनांमध्ये दोन प्रवासी त्यांच्या सामानात ठेवलेल्या कपड्यांमध्ये लपवून सोन्याची तस्करी करत होते. तो दुबईहून मुंबईला पोहोचला होता. या पाच आरोपींचा काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *