चारा घोटाळा प्रकरण ; लालू प्रसाद यादव याना पाच वर्ष शिक्षा
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांना ६० लाखांचाही दंड ठोठावण्यात आला आहे. आज रांची येथील विशेष सीबीआय कोर्टाने दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. १५ फेब्रुवारी रोजी न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. या पाचव्या प्रकरणापूर्वी लालू यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये १४ वर्षांची शिक्षा झाली आहे.
दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी आहेत १३९ कोटी रुपयांच्या दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं होतं. लालू प्रसाद यादव यांच्यासह ३८ दोषींच्या शिक्षेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यापूर्वी १५ फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी ४१ जणांना दोषी ठरवून २१ फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील सुनावणी निश्चित केली होती. आज यापैकी ३८ जणांना शिक्षा होणार आहे. अन्य तीन दोषी १५ फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाहीत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. ज्या ३८ जणांना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे, त्यापैकी ३५ जण बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. तर लालू प्रसाद यादव, डॉ. के.एम. प्रसाद आणि यशवंत सहाय यांना प्रकृतीच्या कारणास्तव राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आलं आहे.