करणवीर बोहोरा विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकार
नुकताच लॉकअप मधून झळकलेला आणि छोट्या पध्द्यावर प्रसिद्ध असलेला अभिनेता कारणवीर बोरा याच्यावर एका महिलेने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. करणवीर बोहराने एका 40 वर्षीय महिलेची पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी त्याने त्या महिलेला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप आहे. ओशिवरा पोलिसांनी करणवीरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितलं की, मनोज बोहरा उर्फ करणवीर बोहरा याने तिच्याकडून 1.99 कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. 2.5 टक्के व्याजासह ते पैसे परत करण्याचं आश्वासन त्याने दिलं होतं. परंतु आतापर्यंत केवळ 1 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.
लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा, सैन्य दलात बंपर भरती
महिलेचा आरोप आहे की जेव्हा तिने तिचे पैसे परत मागितले तेव्हा करणवीर आणि त्यांची पत्नी तजिंदर सिद्धू यांनी नीट उत्तर दिलं नाही. इतकंच नव्हे तर त्यांनी महिलेला गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी करणवीर बोहरा आणि इतरांविरुद्ध तपास सुरू केला आहे. लवकरच त्यांचे जबाब नोंदवले जातील.
टोमॅटोचे संकरित बियाणे उत्पादन तंत्र
काही दिवसांपूर्वीच करणवीर बोहरा हा कंगना रनौतच्या लॉक अप या रिॲलिटी शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये त्याने आपल्यावर खूप कर्ज असून अनेक खटलेसुद्धा सुरू असल्याचा खुलासा केला होता. करणवीरने रडत रडत सांगितलं होतं की, पैसे परत करू न शकल्यामुळे त्याच्याविरोधात अनेक केसेस सुरू आहेत. त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने आत्महत्या केली असती. “मी कर्जबाजारी झालो आहे. मी पैसे परत न केल्याने माझ्यावर 3-4 केसेस सुरू आहेत. 2015 पासून मी जे काही काम केलं आहे किंवा करत आहे, मी ते फक्त यासाठी करत आहे की मी त्याचे पैसे परत करू शकेन. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने आत्महत्या केली असती,” असं तो म्हणाला होता.