देश

बनावट व्हाट्सअपमुळे लागला लाखोंचा गंडा

Share Now

मुंबई उपनगरीय हॉटेलमध्ये ५३ वर्षीय कर्मचारी महिलेला सायबर चोरट्यांनी २ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला. सायबर चोरट्यांनी अनोळखी नंबर वरून व्हॉटसॲप वर संदेश पाठवले. ह्या आरोपीने हॉटेल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे व्हासॲपवर डीपी लावून महिले सोबत चॅटिंग केली. संबंधित पीडित महिलेने अंधेरी ईस्ट एम.आय.डी.सी. येथे एफआयर दाखल केला आहे.

अमरावती उमेश कोल्हे खून प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय, 7 आरोपींना 22 जुलैपर्यंत NIA कोठडी

कर्मचारी महिला हॉटेल मध्ये सेक्रेटरी पदावर कार्यरत असून, प्रथम मंगळवारी महिलेला रात्री ८:५० सुमारास तिच्या नावाने संबोधित करणारा पहिला मजकूर प्राप्त झाला. व्हाटसॲप डीपी बघितला असता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असल्याचे आढळले. ई-टास्क साठी १० हजार रुपयांसाठी १० गिफ्ट कार्ड घेण्यास सांगितले. अधिकारी सांगत असल्याचा समजून महिलेने ते गिफ्ट कार्ड खरेदी केले. पुन्हा दुसऱ्या दिवशी रिफंड करणार असे आश्वासन सुद्धा दिले.

काही वेळानंतर अजून १५ गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास सांगितले. आपल्या बँक खात्यातीतील रक्कम कमी होत आहे पाहून महिलेने दुसऱ्या बँक खात्यावरून व्यवहार करण्यास सुरुवात केले. ऐकून २५ गिफ्ट कार्ड खरेदी केले. गिफ्ट कार्ड विकत घेण्यासंबंधात काही लिंक्स पाठवण्यात आल्या. त्या लिंक्स मधून शाश्वती न मिळाळ्याने दुसऱ्या दिवशी माहिती देण्यासाठी कार्यालयात गेली. संबंधित अधिकाऱ्याने आपण असे कोणतेच व्हॉटसॲप लिंक्स किंवा मेसेज केले नसल्याचा दावा केला आहे.

आता राज्याच्या सीमेबाहेरही शेतकरी आपला शेतीमाल सहज विकू शकणार, (POP) लाँच

कर्मचारी महिलेची एका रात्रीत २ लाख ५० हजार रुपयांचा सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात घेता, अंधेरी एम आय डी सी पोलीस फसवणूक करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीला महिलेचे नाव कसे माहित ? हॉटेल कर्मचारी किंवा व्यवस्थापनाचे ह्या मध्ये काही संबंध आहे का? ह्याची पोलीस चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *