सोलापुर मध्ये माजली खळबळ; क्रूर मुलाने स्वतच्या बापाचा केला खून; गळा दाबून केली हत्या.
सोलापुर मध्ये माजली खळबळ; क्रूर मुलाने स्वतच्या बापाचा केला खून; गळा दाबून केली हत्या.
सोलापुर मध्ये माजली खळबळ; सोलापूरमध्ये मुलानेच गळा दाबून बापाची हत्या केली!
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलानेच आपल्या वडिलांची गळा दाबून हत्या केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव चंद्रकांत विठ्ठल व्हनमाने आहे, तर आरोपीचे नाव सागर चंद्रकांत व्हनमाने आहे.
घरात वास्तु दोष असल्यास करा गणपतीचे ‘हे’ सोपे उपाय
याप्रकरणी मंद्रूप पोलिसांनी तपास सुरू केला असता, शेतकऱ्याच्या मृत्यूची गूढ परिस्थिती स्पष्ट होऊ लागली. २० नोव्हेंबर रोजी, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी, चंद्रकांत व्हनमाने यांचे शरीर बोळकवठे येथील शेतात आढळले. मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर, गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
तपासात पुढे आलं की, चंद्रकांत यांची हत्या त्यांच्याच मुलाने सागर व्हनमाने केली होती. सागरने वडिलांना गळा दाबून मारल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची रवानगी कोठडीत केली आहे.
त्यानंतर, हत्येचे कारण स्पष्ट होत नाही. पोलिस या प्रकरणी सागर व्हनमाने याची कसून चौकशी करत आहेत. सागरच्या या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात धक्काच बसला आहे.