हातपाय आणि शीर तोडलेला मृतदेह आढळून आल्याने पुण्यात खळबळ
पुणे :- पुण्यात लोणी काळभोर येथे आढळून आलेल्या हातपाय आणि शीर तोडलेल्या मृतदेहामुळे खळबळ उडाली आहे. संतोष तुकाराम गायकवाड वय ४५ हत्या झालेल्या व्यक्तीच नाव असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस भीमा नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही हात दोन्ही पाय गुडघ्यापासून कापलेल्या अवस्थेत आढळून आले आणि धडापासून शिर कापण्याचा प्रकार हत्या करणाऱ्यांनी केला अशी माहिती आहे. घटनास्थळी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून संतोष गायकवाड यांचा मृतदेह असल्याचे कळाले. हत्या झालेला संतोष गायकवाड मच्छी व्यवसायिक असून भवरपूर येथून बहिणीला भेटण्यास निघाला होता. मात्र वाटेतच त्याची हत्या करण्यात आली.
संतोष गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून भीमा आणि मुळा नदीवर मासेमारीचा व्यवसाय करतो. संतोष गायकवाड यांच्या हत्येमुळे पुण्यात खळबळ उडाली. त्यासोबतच छिन्नवीछीन्न अवस्थेत सापडला मृतदेह पाहून पोलिसही चक्रावली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहे, मात्र अद्यापही खून कोणी आणि का केला..? त्याचा तपास लागलेला नाही.